
| पुस्तकाचे नाव: | गांधर्वी | लेखक: | बाणी बसू |
| प्रकाशन: | मेहता पब्लिशिंग हाऊस | पृष्ठसंख्या: | 224 |
| मूल्यांकन: | 10/10 | किंमत: | ₹150.00 Order Now |
‘गांधर्वी’ या ‘बाणी बसू’ लिखित कादंबरीची मराठी भाषांतरित आवृत्ती वाचली. ‘मृणालिनी गडकरी’ यांनी फार सुंदर प्रकारे भाषांतरित केली आहे ही कादंबरी, काही बंगाली इंग्रजी शब्द जाणीवपूर्वक जसेच्या तसे वापरलेत. नावात म्हटल्याप्रमाणे ही एका गायिकेची कथा. गाणं म्हणजे जिचा श्वास. सर्वसामान्य घरातली पोर पण गायला लागली की जणू काही सुरलोकातून अवतरलेली गांधर्वीच बनून जाते. कलाकार आणि गृहिणी यांचा सुवर्णमध्य लीलया साधत सुरु असलेली तिची कलेची वाटचाल फार सुंदर रेखाटलीय. तुमचं पुस्तक हे पुस्तक न रहता त्याचा कधी मैफिलीचा रंगमंच होतो, कधी ग्रामोफोन होतो, कधी सुंदर चित्र रेखाटलेला कॅनव्हास तयार होतो. आता पुस्तक वाचून मिटलं तरी दूर कुठूनतरी पुसटसा ‘दरबारी कानडा’ ऐकू येतो.

