
| पुस्तकाचे नाव: | उपरा | लेखक: | लक्ष्मण माने |
| प्रकाशन: | मेहता पब्लिशिंग हाउस | पृष्ठसंख्या: | 190 |
| मूल्यांकन: | 8/10 | किंमत: | ₹300.00 Order Now |
लक्ष्मण माने यांचं उपरा हे पुस्तक वाचलं. कैकाडी समाजाचं जिणं खूप चांगल्या पद्धतीने मांडलं आहे. शिक्षणाने माणूस बदलतो, विचार बदलतात, पण दुर्दैवाने जात बदलत नाही. जातपात अमान्य असलेला माणूस जातीत असून ‘उपरा’ च बनतो, म्हणून हे शीर्षक समर्पक वाटतं. शिक्षण, नोकरी, संसार हे सारं जमवण्यासाठी लेखकाने केलेली धडपड, आणि येणाऱ्या अडचणी, हा सारा प्रवास समाजावर एक चपराक ठरते. यात केवळ जातीचा अन्याय अधोरेखित केलाय असं नाही, पण लेखक आयुष्य पुरेपूर जगलाय, त्याने युक्त्या शोधून काढल्यात, जगण्याशी तडजोड केलेली नाही, खेळायच्या वयात खेळला आहे, सिनेमे पाहिले आहेत, सिगारेटी ओढल्यात त्यामुळे वाचतांना पुस्तक रंजक वाटतं. नक्की वाचा.

