150+ Books Reviews    |    15000+ Visitors/Month    |    800+ Comments    |    4000+ Books Sold    |    150+ Books Reviews    |    15000+ Visitors/Month    |    800+ Comments    |    4000+ Books Sold    |   

युगंधरा –  डॉ सुमति क्षेत्रमाडे  |   Yugandhara – Dr. Sumati Kshetramade  | Marathi Book Review |  Pustakanubhav

Book Page Image
पुस्तकाचे नाव: युगंधरा लेखक: डॉ सुमति क्षेत्रमाडे
प्रकाशन: रिया पब्लिकेशंस पृष्ठसंख्या: 448
मूल्यांकन:
8.5/10
किंमत: ₹400 Order Now

‘युगंधरा’ कादंबरीचं नाव वाचून पहिलं मत असं झालं की हा बहुतेक ‘युगंधर’ कादंबरीच्या लोकप्रियतेचा फायदा उचलण्याचा प्रयत्न असावा. पण नंतर डॉ. सुमति क्षेत्रमाडे हे नाव वाचलं आणि निश्चिंतपणे पुस्तक वाचायला घेतलं.

ही कथा आहे युगंधरा म्हणजेच ‘युगा’ची, तिच्या त्यागाची, तिच्या नितळ निर्व्याज्य प्रेमाची. अत्यंत हुशार असून सतत परिस्थितीशी जुळवून घेत, वेळप्रसंगी नमतं घेत जगणाऱ्या एका स्त्रीची. आपल्या वडिलांसाठी, कुटुंबासाठी ती सारं काही सोसते. या कुंडात पहिली आहुती पडते ती तिच्या प्रेमाची, मग स्वप्न होरपळतात, तिच्या वैयक्तिक महत्वाकांक्षा या धगीने काळवंडतात. एवढं सारं होऊनही आयुष्यात काही विशेष साधत नाही, कारण तिचं आयुष्य हे तिच्यासाठी नसतंच मुळी, सतत दुसऱ्याची गैरसोय होणार नाही हे पाहताना, आपल्या सोयीने आयुष्य जगायची मुभा तिला नसते, तरीही बिनतक्रार हसतमुख राहून ती ते जग आपलं मानून समरसून जगते. पण तिचं नेमकं अस्तित्व काय, तिची मायेची माणसं नेमकी कोण हा प्रश्न वाचकांना पडल्याशिवाय राहत नाही.

कादंबरी वाचताना नायिकेचं जास्त सोशिक असणं कधी कधी खटकतं, पण हा काळ १९७० च्या आसपासचा आहे हे लक्षात ठेवावं लागतं. आपल्या आजूबाजूला अशा अनेक ‘युगा’ आहेत ज्या स्वतःच्या कुटुंबाला प्राधान्य देतात, प्रसंगी आपली स्वप्नं, महत्वाकांक्षा पणाला लावतात.

पुस्तक वाचून झाल्यावर अशा माहितीतल्या अनेक ‘युगा’ आपल्याला आठवतात, पण यावेळी मात्र बदल म्हणून आपण त्यांच्याकडे एका वेगळ्या कौतुकमिश्रीत नजरेने पाहू लागतो, म्हणूनच प्रत्येकाने वाचून, समजून घेतली पाहिजे अशी ही ‘युगंधरा’.

– प्रसाद साळुंखे

SHARE THIS :

Related Books (तुमच्यासाठी सुचवलेले) -

4 thoughts on “युगंधरा –  डॉ सुमति क्षेत्रमाडे  |   Yugandhara – Dr. Sumati Kshetramade  | Marathi Book Review |  Pustakanubhav”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

4 thoughts on “युगंधरा –  डॉ सुमति क्षेत्रमाडे  |   Yugandhara – Dr. Sumati Kshetramade  | Marathi Book Review |  Pustakanubhav”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top