
| पुस्तकाचे नाव: | निवडक | लेखक: | शं. ना. नवरे |
| प्रकाशन: | - | पृष्ठसंख्या: | 0 |
| मूल्यांकन: | 9/10 | किंमत: | ₹200.00 Order Now |
नुकताच निवडक शं ना नवरे कथासंग्रह वाचला. यात १२ कथा आहेत. प्रत्येक कथेचं वेगळेपणं राखलं आहे. मध्यमवर्गीय माणसाला भावतील अशा कथा या पुस्तकात आहेत. त्यांच्या प्रत्येक कथेची स्वतंत्र अशी एक शैली आहे. १२ वेगवेगळ्या आशयाच्या कथा यात आहेत. त्यात सामान्य कुटुंबातला ‘रविवार’ आहे, ‘बॅग’ सारखी विनोदी कथा आहे, ‘बिलोरी’, ‘मधुवंती’ सारख्या वेगळ्या धाटणीच्या कथा आहेत, ‘नाटककार’ नावाचा वेगळा प्रयोग आहे. ‘सूर्य झाला दिपिका’, ‘गट्टी’ सारख्या कथा बराच काळ स्मरणात राहतात. वेगवेगळ्या विषयांना या १५६ पानी छोट्याशा पुस्तकात शन्ना स्पर्श करतात, आणि विशेष म्हणजे या साऱ्या कथा आपल्याला गुंतवून आणि गुंगवून ठेवतात. नक्की चाळावा असा हा कथासंग्रह. पुस्तक तसं छोटं आहे पण मला अधाशासारखं संपवता येत नाही, दिवसाला एक दोन कथा वाचून होतात, कारण त्या कथेतले विचार मुरायला काही काळ जातो, आणि तो विचार सोडून पुढच्या कथेचा फडशा पाडायला रसिक मन परवानगी देत नाही.
– प्रसाद साळुंखे

