150+ Books Reviews    |    15000+ Visitors/Month    |    800+ Comments    |    4000+ Books Sold    |    150+ Books Reviews    |    15000+ Visitors/Month    |    800+ Comments    |    4000+ Books Sold    |   

तत्त्वमसि –  ध्रुव भट्ट  |  Tattvamasi – Dhruv Bhatt | Marathi Book Review |  Pustakanubhav

Book Page Image
पुस्तकाचे नाव: तत्त्वमसि लेखक: ध्रुव भट्ट
प्रकाशन: मेहता पब्लिशिंग हाऊस पृष्ठसंख्या: 184
मूल्यांकन:
9/10
किंमत: ₹180.00 Order Now

‘ तत्वमसि ‘ उपनिषदातलं खूप गहन अर्थ असलेलं, वरकरणी एक शब्द पण वास्तवात एक महावाक्य. नावापासूनच वेगळेपण जपणाऱ्या ध्रुव भट्ट लिखित या मूळ गुजराथी पुस्तकाचा अंजनी नरवणे यांनी फार उत्तम मराठी अनुवाद केला आहे. भारतीय संस्कृतीत नेमक्या कुठल्या धाग्याने विविध धर्माचे , पंथाचे, जातीचे, स्तरातले लोक बांधले गेले आहेत यावर सर्वांगाने विचार करायला हे पुस्तक भाग पाडतं. अध्यात्मिक विचार करायला लावणारं पुस्तक असूनही हे बोजड प्रवचनाने, वा चमत्काराने भारलेलं नाही.

‘ सारं थोतांड आहे ‘ असा असंवेदनशील उद्धट पुरोगामी सूर नाही, वा असं मत मांडणाऱ्याना खोडून काढलं आहे असंही नाही. संस्कृतीचा प्रवाह काठावर बसून अभ्यासून त्यावर आपल्या बौद्धिक वकुबानुसार उथळ वरवरची मतं प्रदर्शित करण्यापेक्षा, त्या प्रवाहात उतरून तिची गुपितं जाणून घ्यायचा हा फार सुंदर प्रवास आहे.

यातला कथानायक हा परदेशातून ‘मानव संसाधन विकास’ या विषयावर काम करायला आदिवासी पाड्यात राहतो. आपली मतं घेऊन आलेला तो, आणि निसर्गाच्या सहवासात, अस्सल मातीतल्या रानावनात वाढलेल्या माणसांच्या सानिध्यात राहून बदललेला असा हा, कथानायक आपल्याला फार भावतो. हा परदेशातून आलेला वगैरे उल्लेख केला म्हणून सरळसोट ‘ स्वदेश ‘ वगैरे सारखं थोडं फिल्मी कथानक आहे असा गैरसमज होऊ शकतो, पण पुस्तक जरा वेगळं आहे. चोखंदळ वाचकांना वाचायला आवडेल असं आहे. अडाणी मागासलेले समजल्या जाणाऱ्या आदिवासींना शिकवण्यासाठी शाळा जशी गरजेची आहे, तसंच त्यांचीही कौशल्य, समज, मेहनत, निसर्गाचा आदर, प्रामाणिकपणा, जगण्यातली सचोटी पुढारलेल्या समजणाऱ्या आपणही आत्मसाद करणं गरजेचं आहे, कारण त्यांना कदाचित या देशाला भारत म्हणतात हे माहीत नसेल, पण भारतीय संस्कृती तेही टिकवतात कदाचित आपल्यापेक्षा जास्त प्रमाणात टिकवतात.

संस्कृती म्हटलं तर नद्यांना वगळून कसं चालेल. भारतीय संस्कृतीचा प्रवाह जणू नदीच्या प्रवाहापासून वेगळा होतच नाही. उत्तर आणि दक्षिण या दोन भागांत नर्मदा नदी आपल्या देशाला विभागते, वा लेखक म्हणतो त्याप्रमाणे वेगळा विचार करायला झाल्यास या दोन भागांना ही नदी बांधून ठेवते. एवढी माणसं , अनेक जीवजंतू, प्राणिमात्र, इतिहास , अनेकानेक स्थित्यंतरं जपणारी ही नदी निर्जीव तरी कशी म्हणावी. मूळात पाणी म्हणजे जीवन, आणि या जीवनाचा स्त्रोत म्हणजे आईच की.

ही नर्मदा नायकाला नानाविध रुपात प्रवासात, किंवा जंगलातल्या वास्तव्यात भेटते, आणि आकर्षित करते. नर्मदा परिक्रमा करणाऱ्या भाविकांची सुरुवातीला निरिच्छेने का होईना पण सेवा करायची संधी नायकाला गवसते, आणि या परिक्रमेतलं साहस, गूढ याने कथानायक अचंबित होतो. पृथ्वीवर नदीवर श्रद्धा असणारं दुसरं कुठलं उदाहरण त्याला आठवत नाही.

वाजपेयीजी म्हणतात त्याप्रमाणे ,

‘यह चन्दन की भूमि है, अभिनन्दन की भूमि है,

यह तर्पण की भूमि है, यह अर्पण की भूमि है।

इसका कंकर-कंकर शंकर है,

इसका बिन्दु-बिन्दु गंगाजल है।’

भारतीय संस्कृतीचा हा सामान्यातल्या सामान्य माणसात आढळणारा सर्वसमभाव, नर्मदेची निर्मळता, कडेकपारींची स्थितप्रज्ञता, सूर्याचं तेज, चांदण्याची शीतलता, झाडापेडांची परोपकारी वृत्ती या साऱ्याचं सार असलेली आणि आपल्या खूप आत रुजलेली ही संस्कृती लेखक छोट्या छोट्या उदाहरणांनी खूप सुंदररित्या अगदी सहजतेने समजावून सांगतो.

यातल्या कथेतल्या कथानायकाचं ‘मानवी संसाधन विकास ‘ या विषयावर लिहायचं काम संपतं, की भारत भेटीने काम संपलं वाटत असताना स्वत:तलं ब्रम्ह गवसून त्याच्या आयुष्याची नवी सुरुवात होते, हे जाणण्यासाठी हे पुस्तक नक्की वाचा.

SHARE THIS :

Related Books (तुमच्यासाठी सुचवलेले) -

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top