
| पुस्तकाचे नाव: | अपरांत | लेखक: | मनोज नाईकसाटम |
| प्रकाशन: | अक्षर प्रकाशन | पृष्ठसंख्या: | 143 |
| मूल्यांकन: | 9/10 | किंमत: | ₹120 Order Now |
अपरांत … कोकणातल्या बहुतेक घरांचं केविलवाणं सत्य, हलक्याफुलक्या पद्धतीने मांडलंय. त्यासोबतच एक पाय कोकणात एक पाय मुंबईत अशी नव्या पिढीची दयनीय अवस्थाही रेखाटलीय. त्याच्या पुढच्या पिढीची कदाचित नात्यांची आणि भौगोलिक अंतरंही जास्त वाढलेली. एका परप्रांतीयाचं कोकणात येणं, इथल्या वृद्ध लोकांना कामात मदत होणं, पाहुण्यांच्या वाटेकडे डोळे लावून बसलेल्या घरांना काही काळ हक्काचा माणूस भेटल्यासारखा वाटणं हे सारं खूप सुंदर पद्धतीने मांडलंय. कोकणातल्या घराची आठवण आल्याशिवाय राहत नाही.
– प्रसाद साळुंखे

