
| पुस्तकाचे नाव: | जोहार मायबाप जोहार | लेखक: | मंजुश्री गोखले |
| प्रकाशन: | मेहता पब्लिशिंग हाऊस | पृष्ठसंख्या: | 338 |
| मूल्यांकन: | 10/10 | किंमत: | ₹240.00 Order Now |
‘जोहार मायबाप जोहार’ ही संत चोखामेळा यांच्या आयुष्यावरची मंजुश्री गोखले यांनी लिहिलेली कादंबरी. विठ्ठलाचा निस्सीम भक्त असूनही, वर्णद्वेषामुळे ज्या भक्तावर अन्याय झाला असा हा महान विठ्ठलभक्त. साक्षात नामदेवांचं शिष्यत्व पत्करलेला. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई ज्याच्या महारवाड्यातील घरात येऊन जेवले, असा थोर पुण्यात्मा. निर्मळ , निःस्वार्थी भक्तीचा अतूट ध्यास घेतलेला एक विठ्ठलवेडा. संत चोखामेळा यांचं चरित्र आपल्याला खूप काही शिकवून जातं. अत्यंत सोप्या भाषेतलं हे पुस्तक आहे, भाषा सोपी असली तरी चोखामेळाच्या आयुष्यातले एक एक प्रसंग हुबेहूब डोळ्यासमोर उभे राहतात, ही मंजुश्री गोखलेंच्या लिखाणाची हातोटी आहे. “धाव घेई विठू आता चालू नको मंद| बडवे मज मारिती ऐसा काय केला मी अपराध| विठ्ठलाचा हार तुझ्या कंठी कैसा आला| शिव्या देऊनी म्हणती महारा देव बाटविला| धाव घेई विठू आता ….” पुस्तक वाचून झालं तरी चोखामेळाचे हे आर्त स्वर पुसटसे ऐकू येतात. नक्की वाचावं असं हे पुस्तक

